औरंगाबादमध्ये’ आयपीएल’ सामन्यावर कोट्यवधीचा सट्टा, मनोज दगडाला अटक

जिल्ह्यात छुप्या पद्धतीने 'आयपीएल'वर सट्टा लावण्यासाठी दगडाचे एजंट कार्यरत

0

औरंगाबाद  :  सध्या आयपीएलचा धुमधाम सुरू असून याच सामन्यावर विविध ठिकाणी एजंट नेमून कोट्यवधींचा सट्टा चालविणाऱ्या सट्टा किंग म्हणून जिल्ह्यात परिचित असलेल्या मनोज दगडाला औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने  बेड्या ठोकल्या आहेत. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजार करण्यात येणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी दगडाचे एजंट कार्यरत होते. जिन्सी पोलिसांनी गेल्या महिन्यात अशाच एका एजंटला अटक केली होती. त्या नंतर दगडाचे नाव समोर आले होते. तर काची वाड्यातून पिता-पुत्रांना अटक केली होती. तर दोन आठवड्यांपूर्वीच सिटीचौक पोलिसांनी रोजेबाग परिसरात एका फ्लॅटमध्ये छापा मारून आयपीएल सामन्यावर सट्टा लावण्यासाठी सुरू असलेला कॉल सेंटरवर छापा मारला होता. विशेष म्हणजे, या ठिकाणी महिला शिक्षिकेला कामावर ठेवले होते. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. तेंव्हापासून गुन्हे शाखेचे पथक दगडाची चौकशी करत होते. चौकशी दरम्यान,  पोलिसांना चकवा देण्यासाठी दगडाने वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि सिमकार्ड हे बनावट कागदपत्रे आधारे घेतल्याचे उघडकीस आले आहे.  त्या क्रमांकावरून सट्टा घेतला जात असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी आज दगडाला अटक केली अशी माहिती सूत्रांनी दिली. हा सर्व प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता तर कोट्यवधी रुपयाची उलाढाल आयपीएल सामन्यावर होत होती. यामध्ये पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी हवाला रॅकेटचा देखील उपयोग करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. आज आरोपी दगडाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, सन 2015 मध्ये देखील शहरातील उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दगडा विरोधात सट्टा प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ही दगडावरची  मोठी कारवाई समजली जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.