अभिनेता मिलिंद सोमणने 25 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा?

0

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आपल्यापेक्षा 25 वर्षांनी लहान गर्लफ्रेंड अंकिता कोंवरसोबत साखरपुडा केल्याची चर्चा आहे.

मिलिंदची गर्लफ्रेंड अंकिताने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावरून त्यांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या फोटोमध्ये अंकिताने मिलिंदचा हात धरला आहे, आणि अंकिताच्या बोटात अंगठी दिसत आहे. त्यानुसार दोघांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याचे बोलले जात आहे.

अंकिताने फोटो शेअर करून लिहिले, ‘तूझ्याशिवाय जगणे कसे असू शकते, हे मला मूळीच जाणून घ्यायचे नाहीये.’

सूत्रांच्या सांगण्यानुसार, काही दिवसांपूर्वी मिलिंद गर्लफ्रेंड अंकिताच्या घरी तिच्या आई-वडिलांकडे लग्नाविषयी बोलायला गेला होता. परंतु अंकिताचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. कारण मिलिंद आणि अंकिताच्या वयात बराच फरक आहे. परंतु मिलिंदचा चांगला स्वभाव पाहता त्यांनी नंतर होकार दिला.

मिलिंदने 2006 मध्ये अभिनेत्री मिलिन जॅम्पेनोईसोबत लग्न केले होते. मात्र दोघांचा तीन वर्षांत म्हणजे 2009 मध्ये घटस्फोट झाला.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.