एमजीएम’चे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांना ‘प्रेरणादायी कुलगुरू’ पुरस्कार ‘

राष्ट्रीय पातळीवरील 'सर्वाधिक प्रेरणादायी कुलगुरू 2020' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित

0

औरंगाबाद : महाराष्ट्रातील नामंकित ज्येष्ठ माध्यम व शिक्षणतज्ज्ञ आणि औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वाधिक प्रेरणादायी कुलगुरू 2020’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाला आहे.

औरंगाबाद येथील नामंकित ज्येष्ठ माध्यम, शिक्षणतज्ज्ञ आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वाधिक प्रेरणादायी कुलगुरू 2020’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाला.  राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार ‘गोल्डन एम अॅवॉर्ड  फॉर एक्सलन्स अँड लीडरशिप इन एज्युकेशन’ संस्थेद्वारे दरवर्षी देण्यात येतो. ‘सर्वाधिक प्रेरणादायी कुलगुरू 2020’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार 20 ऑक्टोबरला  वितरित होणार आहे. स्मृतिचिन्ह व मानपत्र, असे  या पुरस्काराचे स्वरूप आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक यांना लेखन, प्रभावी व्याख्यानाद्वारे प्रेरणा देण्याचे व नवनव्या कल्पना सातत्याने राबविण्याच्या लक्षणीय सकारात्मक कार्याकरिता हा पुरस्कार दिला जातो. प्रा. डॉ. सुधार गव्हाणे यांनी आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ उच्च शिक्षणाच्या कारकिर्दीत विविध विषयांतील नवनव्या अभ्यासक्रमांची आखणीआणि नव्या विभागांची स्थापना, अॅकॅडमिक स्टाफ महाविद्यालयात प्राध्यापकांकरिता तसेच विद्यार्थ्यांसाठी दोन हजारांहून अधिक प्रेरक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध विषयांना स्पर्श करणारे, अभ्यासाच्यादृृष्टीतून एक संदेश माहिती देणारे, असे  दोन हजारांहूनअधिक लेख त्यांनी लिहिले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र. कुलगुरू असताना डॉ. गव्हाणे यांनी नियोजन व विकासात अनेक उपक्रम राबविले. एमजीएम विद्यापीठात संशोधन प्रकाशन, करिअर कौन्सिलिंग मिशन आदींसह विविध प्रेरक उपक्रम डॉ. गव्हाणे यांनी राबविले. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, तसेच सर्व प्राचार्य, प्राध्यापक यांच्या सकारात्मक दृष्टीने आणि पाठबळामुळे  हे कार्य मला पार पाडता आल्याचे डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आवर्जून सांगितले. डॉ. सुधीर गव्हाणे यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळल्याबद्दल सर्वच स्तरांहून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.