जागतिक रेडिओ दिनानिमित्त मलाबार गोल्ड्सकडून ‘एमजीएम रेडिओ’चा सत्कार
मलाबार गोल्ड अँड डायमंडस तर्फे एमजीएम ९०.८ एफएमच्या सर्व आरजे आणि टीमचा विशेष सत्कार
औरंगाबाद : जागतिक रेडिओ दिनानिमित्त मलाबार गोल्ड अँड डायमंडस तर्फे एमजीएम ९०.८ एफएमच्या सर्व आरजे आणि टीमचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतूक केले.
जागतिक रेडिओ दिनानिमित्त मलाबार गोल्ड अँड डायमंडस तर्फे एमजीएम ९०.८ एफएमच्या सर्व आरजे आणि टीमचा विशेष सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातही रेडिओ एमजीएमने अनेक विविधांगी आणि कल्पक कार्यक्रम सादर करून श्रोत्यांचे मनोरंजन केले. या पार्श्वभूमीवर मलाबार गोल्ड्सच्या वतीने एमजीएम रेडिओचे आरजे अमृता, दिव्या, अस्मी, अदनान, भूषण यांच्यासह टेक्निकल हेड विकास भगूरे, देवश्री पुजारी आणि अन्य सर्व कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.१३ फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिन असतो. यूनेस्कोने २०११ मध्ये या दिनाची घोषणा केली होती. रेडिओमध्ये अनेक कर्मचारी अभिनव पद्धतीने कार्य करत श्रोत्यांचे मनोरंजन करत असतात. त्यांना सर्वप्रकारच्या माहिती देत असतात. त्यांना शिक्षित करत असतात आणि रेडिओ एमजीएमद्वारे हे कार्य उत्तम प्रकारे सुरू आहे. या वेळी मलाबार गोल्ड अँड डायमंडचे अशोक गायकवाड आणि इम्रान शेख यांची उपस्थित होती. या स्तुत्य उपक्रमाबद्दल स्टेशन हेड देवाशीष शेडगे, जनसंवाद आणि पत्रकारिता महाविद्यालयांच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी मलाबार गोल्ड अँड डायमंडसचे आभार व्यक्त केले आहे.