‘मेट्रो कारशेड’वरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी
केंद्र सरकार आणतंय देशात हळूहळू आणीबाणी ; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्ला
मुंबई : मेट्रो कारशेडच्या जमिनीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी पेटलेली असतानाच आता या वादात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली. मिठागराची ती जागा राज्य सरकारचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर पहिला अधिकार हा त्या राज्याचाच असतो, असे सांगतानाच केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
मेट्रो कारशेडच्या जमिनीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी पेटलेली असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या वादात उडी घेतली. मिठागराची ती जागा राज्य सरकारचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर पहिला अधिकार हा त्या राज्याचाच असतो, असे सांगतानाच केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात संताप व्यक्त करतानाच केंद्राच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेधही नोंदवला आहे. केंद्र सरकारने मिठागराच्या जागेवर दावा केला आहे. ही त्यांचीच जमीन असल्याची धक्कादायक गोष्ट त्यांच्याकडूनच कळली. खरे तर ती जमीन महाराष्ट्राचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर त्या राज्याचा पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे काम करत आहे. त्यांच्या कृतीतूनच हे दिसत असून ही दुर्देवी घटना आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. कांजूरमार्गमधील मिठागराची जमीन महाराष्ट्राची आहे. विकासकामासाठी तिचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप कोणत्या आधारावर टीका करत आहे, असा सवाल करतानाच केंद्र सरकार या देशात हळूहळू आणीबाणी आणू पाहत आहे. सध्या तरी तसेच चित्रं दिसते आहे, असेही त्या म्हणाल्या.