राज्यात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’

13 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

0

पुणे  : वारंवार हवामानातील बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले . पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे .  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस  पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून  वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वारंवार हवामानातील बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे . या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाकडून रायगडकरांना सर्व यंत्रणांनी सावध राहण्याचा इशारा  दिला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.