‘राजर्षी शाहु विद्यालया’त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ आणि भावी आयुष्य उज्ज्वल बनवा - मुख्याध्यापक वाघमोडे
पैठण : जायकवाडी (पैठण)- येथे ‘राजर्षी शाहु विद्यालया’त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक म्हणाले, शिक्षणासाठी सर्व तयारीने कष्ट करण्याची सवय मुलांनी स्वत:ला लावली पाहिजे. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतले ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेली आहेत. कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर रुजतात. तर कष्टातून तावून सुलाखून चांगला अनुभव मिळतो.
जायकवाडी (पैठण)- येथील ‘राजर्षी शाहु विद्यालया’त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक म्हणाले, शिक्षणासाठी सर्व तयारीने कष्ट करण्याची सवय मुलांनी स्वत:ला लावली पाहिजे. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतले ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेली आहेत. कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर रुजतात. कष्टातूनच विद्यार्थी तावून सुलाखून चांगला अनुभव मिळवतो.आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ दिले पाहिजे. भावी आयुष्य उज्ज्वल बनवा, असे जायकवाडी येथील ‘राजर्षी शाहु विद्यालया’चे मुख्याध्यापक शंकरराव वाघमोडे यांनी सांगितले. ता, 7 आँगस्ट रोजी दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक शंकरराव वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास कृष्णा राजगे, शुभदा वाघ यांची महत्वाची उपस्थिती होती. विद्यालया’चे मुख्याध्यापक वाघमोडे यांनी सांगितले की, वडिलांचे स्वप्न व तुमची महत्वकांक्षा यांची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. आज मोबाईलमधील इंटरनेटचा वापर शैक्षणिक प्रगतीसाठी करून घेतला पाहिजे, आदी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.यावेळी शिक्षकवृंदासह पालकांची उपस्थिती होती.