स्मार्ट सिटी बसडेपोसंदर्भात आज मुंबईत बैठक – मनपा प्रशासक

पालकमंत्री सुभाष देसाई व परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक

0
औरंगाबाद  : कोरोनाचा संसर्गामुळे  लॉकडाऊन करण्यात  आल्याने  शहर बससेवा पाच महिन्यांपासून बंद आहे. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांची ने – आण करण्यासाठी स्मार्ट सिटी बसचा सध्या वापर करण्यात येत आहे. स्मार्ट बस डेपोकरिता जागा आणि परिवहन विभागाला डेपो उभारण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महापालिका आणि परिवहन विभागाची संयुक्त बैठक  आज मुंबई येथे होणार आहे.
स्मार्ट बस डेपोकरिता जागा आणि परिवहन विभागाला डेपो उभारण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महापालिका आणि परिवहन विभागाची संयुक्त बैठक  आज  मुंबई येथे होणार आहे. या बैठकीतच स्मार्ट सिटी बस सुरू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सुभाष देसाई व परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याची माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. शहरात धावत असलेल्या स्मार्ट सिटी बसला ब्रेक लागलेला आहे. परंतु शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार असल्याचे संकेत मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. स्मार्ट बसेससाठी डेपो उभारण्याकरिता लिजवर जागेची मागणी राज्य मार्ग परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे.बसस्थानक उभारण्यासाठी महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच मनपाकडून आकारण्यात येणारी फिस माफ करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही विषयांवर एकत्रितपणे निर्णय या बैठकीत घेतला जाईल. मनपा रेल्वे स्टेशन जवळील जुन्या जागेतच बस डेपो सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.