राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक, धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर होणार चर्चा?

अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल पटेल यासारखे दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांसारखे दिग्गज नेते उपस्थित आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांसारखे दिग्गज नेते उपस्थित आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत चर्चा होण्याची शक्यता. धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिलेली महिला पुन्हा एकदा पोलिस ठाण्यात दाखल झाली. डी. एन. नगर पोलिस ठाण्यात जाऊन ती सहाय्यक पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे. याआधीही पीडित महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिलेचे आरोप काय?
धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये संधी आणि लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तिने ओशिवरा पोलिस ठाण्यात 10 जानेवारीला तक्रार केली. या प्रकरणी 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. तरुणीने केलेल्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरू असल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे.

धनंजय मुंडेंचा दावा काय?
समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्रे प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी, अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.
मीडियाला कळू न देता धनंजय मुंडे ‘चित्रकूट’वर
मुंबईच्या मलबार हिल येथील ‘चित्रकूट’ बंगल्यावर येताना गुरुवारी पहाटेही धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून ‘चित्रकूट’ बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज पटकन येणे शक्य नव्हते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलिस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच ‘चित्रकूट’ बंगल्यावर आले होते.

बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे तेवढेच महत्वाचे आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.