नगराध्यक्षांची विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत बैठक, कर्मचाऱ्यांची कानउघाडणी

अनेक तक्रारीनंतर पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांची नगरपरिषद कार्यालयात तातडीची बैठक

0

पैठण : शहरातील बरेच दिवसापासून पैठण नगर परिषदेमार्फत होत असलेला पाणीपुरवठा विस्कळीत झालेला नागरिकांना जाणवत होता, अनेक तक्रारीनंतर पैठण नगर परिषद चे नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी नगरपरिषद कार्यालयामध्ये पाणी पुरवठा निरीक्षक व नगर परिषदेचे कर्मचारी यांची तातडीची बैठक बोलावून चांगलीच कानउघाडणी केली.

अनेक तक्रारीनंतर पैठण नगर परिषद चे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी नगरपरिषद कार्यालयामध्ये पाणी पुरवठा निरीक्षक व नगर परिषदेचे कर्मचारी यांची तातडीची बैठक बोलावून चांगलीच कानउघाडणी केली. पंप हाऊस येथे तांत्रिक बिघाडामुळे व मुख्य मोटरमध्ये कचरा अडकल्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने भरणा टाकीत पोहोचत होता. त्यामुळे अध्यक्ष यांनी तातडीने नगर परिषद कार्यालय येथे बैठक घेऊन संबंधीत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले व तसेच काम तातडीने सुरू देखील झाले. आजपासुन पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पाणी पुरवठा निरीक्षक व्‍यंकटी पापूलवार यांनी नगरपरिषदेच्या सन्मानीय सदस्यांसमोर अध्यक्षांना सांगितले. यावेळी पाणीपुरवठा सभापती आबासाहेब बरकसे, राष्ट्रवादीचे गटनेते कल्याण भुकेले, नगरसेवक अजित पगारे, नगरसेवक संतोष सव्वाशे, पाणी पुरवठा निरीक्षक व्‍यंकटी पापूलवार व नगर परिषदेचे इतर कर्मचारी उपस्थित होते

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.