राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

शारदाताई अंकुशराव टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

0

जालना : ता. अंबड, पार्थपूर  येथे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४)  यांचे आज 1 ऑगस्ट रोजी  रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या ‘कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्या’च्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे, असा परिवार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४)  यांचे आज 1 ऑगस्ट रोजी  रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या ‘कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्या’च्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी ता. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड, जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादित उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
शारदाताई गेल्या महिनाभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत होत्या. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर रुग्णालयात दाखल होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज रात्री नऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला रुग्णालयात जायचे. रोज सकाळी आईला भेटूनच दिवसाची सुरुवात ते करायचे. ती अजातशत्रू होती. तिने एका शब्दानेही कोणाला दुखावले नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावलीसारखी उभी राहिली. चार वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवून मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. राज्य चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर आईच्या निधनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला. राजेश टोपे यांच्या मातोश्रींचे निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश टोपे यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटले की, राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्मानीय राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे साहेबांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थपणे साथ दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष सुपुत्र महाराष्ट्राला दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.