‘मसिआ’चे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात अवैधपणे कचरा न टाकण्याचे आवाहन

मनपाच्या घनकचरा विभागाने अवैधपणे कचरा टाकणाऱ्यास ट्रकचालकास ठोठावला दहा हजारांचा दंड

0

औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश कारखाने रात्रीच्या वेळेस बंद असतात व त्यामुळे रस्त्यावर रहदारी नसते आणि इतर लोकांची वर्दळही कमी असते. या परिस्थितीचा फायदा घेऊन औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या जागेत अवैधपणे कचरा नेहमीच टाकण्यात येतो.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 3 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान अवैधपणे कचरा टाकत असताना  एका ट्रकचालकास प्रत्यक्ष जागेवर कचरा टाकताना पकडले. हा ट्रकचालक महानगरपालिका झोन क्रमांक 5 मधील वॉर्ड क्र.38, एन-1 सिडको क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कलाग्रामच्या समोर चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर अवैधपणे कचरा टाकण्याच्या प्रयत्नात होता महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रमुख भोवे यांच्या आदेशाने आाणि झोन अधिकारी श्रीमती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने या ट्रक्टरचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि ममोकळ्या जागेत अवैधपणे कचरा टाकल्याबद्दल 10,000 रुपये दंडजाग्वर वसूल केला. या कारवाई वेळी महानगरपालिकेचे स्वच्छता मुख्य निरीक्षक कुलकर्णी, निरीक्षक दिलीप राठोड, सुपरवायझर रवी दांडगे आणि एस वाकरवाल, नागरिक मित्र पथकाचे बनकर, अनिल उंबरहांडे, नगरसेवक राजू शिंदे, मसिआचे सचिव भगवान राऊत आणि कार्यकारिणी सदस्य सुरेश खिल्लारे, टाईनी इंडस्ट्रीजचे संचालक नारायण देसाई आणि नागरिक मिलिंद निकाळजे, विजय सावंत इत्यादी हजर होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.