संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ केले लग्न, अवाजवी खर्चाला फाटा देत आगळावेगळा विवाह

0

औरंगाबाद : एका मंगलकार्यालयात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु असताना अचानक लग्नाची बोलणी ठरली आणि साखरपुड्यात लग्न उरकरण्याचा निर्णय दोन्ही पक्षाच्या वतीने घेण्यात आला. अशावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुढाकार घेऊन लग्नातील रुढी-परंपरेला व आवाजावी खर्चाचा बाजूला ठेऊन टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाजारांच्या पुतळ्याजवळ लग्न लावले. या लग्नाला वधू-वराकडील मोजके नातेवाईक उपस्थित होते.

प्रदीप शंकरराव शिरसाट (रा. सिंधी पिंपळगाव, जि. जालना) आणि पूजा नवनाथ जाधव (रा. सांजुळ. ता फुलंब्री) असे नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. दुष्काळ आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीचा समाना करत असताना शेतक-यांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये. तसेच मुला-मुलींच्या लग्नावर भरमसाठ खर्चही करू नये, यासाठी वधू प्रदीप कार्य करतो.

प्रदीप आणि पूजाचा साखरपुडा एका मंगलकार्यालयात आयोजित केलेला होता. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अशावेळी थाटात लग्न थाटात केले तर चार-पाच लाख रुपये खर्च येईल. त्यामुळे खर्च टाळून प्रदीपने नातेवाईकांसमोर अशा लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि नातेवाईक आणि मराठा क्रांची मोर्चाच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत संभाजी महाराज यांच्या पुताळ्याजवळ वधू-वराचे लग्न लावले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.