हर्सूल तुरुंगातून सुटताच चरस, ड्रग्स तस्कराची काढली मिरवणूक, व्हिडिओ व्हायरल
बेगमपुरा भागात फटाक्याची आतषबाजी करत त्यांची काढली मिरवणूक
औरंगाबाद : बुधवारी अकबर हाश्मी याची हर्सूल कारागृहातून सुटका होताच तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी करत बेगमपुरा भागात त्याची मिरवणूक काढली. ड्रग्जची तस्करी करणा-या चौघांना 29 सप्टेंबर रोजी सकाळी पंचवटी चौकात सापळा रचून वेदांतनगर पोलिसांनी अटक केली होती.
हर्सूल कारागृहातून सुटका होताच, तरुणांनी त्यांची फटाक्याची आतषबाजी करत बेगमपुरा भागात त्याची मिरवणूक काढली. ड्रग्जची तस्करी करणा-या चौघांना 29 सप्टेंबर रोजी सकाळी पंचवटी चौकात सापळा रचून वेदांतनगर पोलिसांनी अटक केली होती. आसिफ अली मुसा कुरैशी ( 41, रा.कुर्ला, मुंबई), नुरूद्दीन बद्रोद्दीन सय्यद ( 41, रा. बांद्रा, मुंबई), फैजान खान आयुब खान (वय 34, रा.आरेफ कॉलनी), अकबर हाश्मी हिमायत हाश्मी ( 24, रा.आसेफिया कॉलनी) अशी चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एमडी ड्रग्सच्या 13 तर चरसच्या 25 पुड्या जप्त केल्या होत्या. याप्रकरणात बुधवारी अकबर हाश्मी याची हर्सूल कारागृहातून सुटका होताच तरुणांनी फटाक्याची आतषबाजी करत बेगमपुरा भागात त्याची मिरवणूक काढली. त्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. यावर पोलिसांकडून काय कारवाई होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.