मराठी तरुण मनोज जाधवची गगन भरारी, ‘गुगल’ने केली ‘फंडींग’

मराठातील एकमेव तरुण, जगभरातील दिग्गजाशी होती स्पर्धा

0
गुगल आहे सोबतीला…
जगभरात कोरोना व्हायरसमुळे जी वैश्विक महामारी आली आहे, त्याचा परिणाम आता सर्वच क्षेत्रांवर दिसू लागला आहे. त्यात अनेक क्षेत्र अक्षरश: होरपळून निघत आहेत. अशात माध्यम क्षेत्रही त्याला अपवाद ठरलं नाही.
अनेक छापिल माध्यमे, ऑनलाईन माध्यमे ही सध्या संकटाच्या काळातून जात आहेत. काही वर्तमानपत्रे बंद झाली आहेत तर काही फक्त डिजीटल स्वरुपात उरली आहेत. अनेक वेबपोर्टल या काळात बंद झाली आहेत की शेवटच्या घटका मोजत आहेत.
अशातही आशेचा किरण म्हणजे काही वेबपोर्टल चांगली कामं करत आहे. ही पोर्टल वाचकांपर्यंत सतत ताज्या घडामोडी, चांगले लेख किंवा खरी माहिती पोहचविण्याचं काम करत आहे. याचमुळे जी वेबपोर्टल संकटातून जात आहे त्यांना गुगल किंवा फेसबुकसारख्या मोठ्या कंपन्या मदत करत आहे. शेवटी या कंपन्यांसाठीही ही वेबपोर्टल कंटेंट क्रेअशनचं मोठं काम करत आहेत.
जगभरातील फक्त दोनसे पोर्टला फंडिंग :
अशातच अनेक पोर्टल अशीही आहेत, ज्यांनी गेल्या २-३ महिन्यात स्वत:ला सिद्ध केले आहे. तसेच एक दर्जेदार कंटेंट लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं आहे. अशा पोर्टलचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच या संकटाच्या काळात टिकण्यासाठी गुगलने मदतीचा हात पुढे केला आहे. जगभरातील १२ हजारहुन अधिक पोर्टलने मदतीची मागणी केली होती. त्यातील २०० पोर्टलला गुगलने ही आर्थिक मदत केली आहे.
मराठीतील एकमेव पोर्टल :
आनंदाची बाब अशी की, enrich media प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंतर्गत येणाऱ्या ‘कृषीनामा’ या शेतीविषयक घडामोडी लोकांपर्यंत पोहचविणाऱ्या मराठी वेबपोर्टलची गुगलने यासाठी निवड केली. प्रादेशिक भाषेत येत असलेली अनेक पोर्टल सध्या चांगलं काम करत आहे. त्यांना असा मदतीचा हात मिळणे ही सुखावह बाब आहे. तसेच या खास प्रवासात गुगलसारख्या मोठ्या कंपनीबरोबर नाव जोडलं जाणं निश्चितचं आनंद देणारी गोष्ट आहे.
गुगलकडून अशी मदत मिळने ही मोठी गोष्ट आहे – मनोज जाधव 
याबद्दल बोलताना enrich media प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज जाधव म्हणाले, गुगलकडून अशी मदत मिळने ही मोठी गोष्ट आहे. आम्ही सतत कंटेंटच्या दर्जावर भर देत आलो आहे. सातत्य व दर्जा या दोन गोष्टींवरच कृषीनामा पोर्टल उभे राहिले आहे. अशात गुगल कधी आपली निवड करेल याचा विचार केला नव्हता. परंतु शेवटी चांगल्या कामाचे फळ मिळाले असेच म्हणावे लागेल.
इनरिच मिडियाच कार्य :
enrich media प्रायव्हेट लिमिटेड ही पुणेस्थित कंपनी महाराष्ट्र व देशातील अनेक पोर्टलसोबत तांत्रिक मदत, रेव्हेन्यु जनरेशन, पोर्टल उभारणी तसेच सोशल मीडिया एंगेजमेंटसाठी काम करते. गेल्या तीन वर्षात १२० हुन अधिक पोर्टलसोबत ही कंपनी काम करत आहे. अशात कंपनीच्या स्वत:च्या पोर्टलला अशी मदत मिळाल्याने आनंद मनोज जाधव यांनी व्यक्त केला जात आहे.
येणाऱ्या काळात कृषीनामाच्या माध्यमातून अधिकाधिक कृषीविषयक कंटेंट निर्मितीचं काम केलं जाईल.  उत्साह जसा वाढला आहे, तशी जबाबदारीही वाढली आहे. असही त्यांनी सांगीतल तसेच  थॅंक्यू म्हणुन गुगल अभारही मानले
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.