बीडमध्ये उद्या ‘मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषद’
मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेला विनायक मेटे, सर्जेराव निमसे राहणार उपस्थित
बीड : मराठा आरक्षणासह समाजाच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी, तसेच विद्यार्थी युवकांना आरक्षणाच्या क्लिष्ट प्रक्रियेची कायदेशीर माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी (ता.5) रोजी शहरात मराठा आरक्षण युवक व विद्यार्थी परिषद होत आहे. ‘आम्ही परिषदेला येत आहोत, तुम्हीही या’, असा नारा आयोजकांनी दिला आहे. परिषदेसाठी विविध विद्यार्थी व युवक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.
सकाळी साडे अकरा वाजता कॅमॉल रस्त्यावरील सूर्या लॉन्स येथे होणाऱ्या परिषदेत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे, माजी कुलगुरू तथा गायकवाड आयोगाचे माजी सदस्य सर्जेराव निमसे, सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ वकील श्रीराम पिंगळे व वकील अमोल करांडे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेला श्रीक्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, इंगळे महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे, लक्ष्मण महाराज रामगडकर, नाना महाराज यांच्यासह शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे, भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा सनदी लेखापाल बी.बी. जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. परिषदेसाठी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीीर काकडे, अ्शोक सुखवसे, राहुल टेकाळे, मुकुंद मोरे, शशीकांत सावंत, वकील योगेश शेळके, वकील गणेश म्हस्के, वकील योगेश टेकाडे, सोमनाथ मोटे, अजय शिंदे, महारुद्र जाधव आदी युवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.परिषदेला मराठा समाजातील विद्यार्थी युवकांनी उपस्थित राहण्यासाठी जिल्हाभरात विविध ठिकाणी बैठकांतून जनजागृृती केली जात आहे. ‘परिषदेला आम्ही येणार तुम्हीही या,’ हे घोषवाक्य तयार करण्यात आले असून परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.