मराठा आरक्षण : विद्यार्थ्यांना अडचणी, एसईबीसी-ईडब्ल्यूएसबद्दल संभ्रम

विद्यार्थी- पालक चर्चासत्रात विनोद पाटलांची मागणी

0

औरंगाबाद : मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यालय आकाशवाणी येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.  रविवार 8 नोव्हेबर रोजी बैठक पार पडली.
मराठा आररक्षणावर आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्याचे राज्य शासन प्रयत्न करताना वैद्यकीय शिक्षणाच्या प्रयत्नात मराठा  विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून सामावून घ्यावे. त्यासाठी मराठा विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी सुपर न्युमरी , खासगी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठाचा कोटा राज्य शासनाने ताब्यात घ्यावा, हे पर्याय सरकारसमोर असून राज्य शासनाने या विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी भरावी, अशी मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. ‘

नीट’चा निकाल लागला. वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले. मात्र मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहेत. ते दूर करण्यासाठी रविवारी बैठक पार पडली. यात मराठा आरक्षणाचा हक्काचा कोटा सहाशे जागांचा तयार करून त्यावर प्रवेश द्यावा. ते प्रवेश करताना त्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी राज्य शासनाने भरावी. ‘ईडब्ल्यूएस’ ही केंद्राची आर्थिक सवलत आहे. तर एसईबीसी हे आरक्षण असून ‘ईडब्ल्यूएस’चा कोटा खासगी व अभिमत विद्यापीठात शून्य आहे. त्यामुळे याठिकाणी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत जागांची उपलब्धता शक्य आहे. ‘ईडब्ल्यूएस’मधून काही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. ती रद्द होणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी, 12 नोव्हेंबरपर्यंत असलेली सीईटी सेलच्या मुदतीीत वाढ मिळून ‘ईडब्ल्यूएस’चे राज्याचे प्रमाणपत्र मिळणे व ते दाखल करण्यासाठी 30 ते 90 दिवसांचा कालावधीी इतर प्रवर्गाप्रमाणे मिळावा. तसेच ईबीसीच्या सवलतीतही इतर प्रवर्गाप्रमाणे फीी भरण्याची मुभा मिळावी आदी ठराव पाटील यांनी बैठकीत मांडले. त्याला उपस्थतितांनी एकमताने समंती दर्शवली. यावेळी अभिजित देशमुख , डॉ. विवेक देशमुख, प्रशांत बनसोड, भाऊसाहेब तरमळे, समाधान साळुंके, बाळासहेब औताडे, प्रशांत शेळके, सुधाकर कापरे आदींनी मार्गदर्शन केले. वैभव गोटे, आदित्य विष्णू, सुहास इंगळे, गणेश आदमाने यांनी प्रवेशाबाबत अडचणी मांडल्या.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.