पुण्यातील उदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित मराठा आरक्षण परिषद रद्द

उदयनराजेंनी निरोप दिल्यानंतर पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द केल्याची माहिती

0

पुणे : पुण्यातील आयोजित मराठा आरक्षण परिषद  केलेली  रद्द करण्यात आली. पुण्यातील रेसिडनसी क्लबमध्ये आज शुक्रवार 30 ऑक्टोबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन ते पाच या वेळेत मराठा आरक्षणाबाबत मंथन करण्यात येणार होते. भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने ही परिषद आयोजित केली होती. बैठक रद्द करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

पुण्यातील आयोजित मराठा आरक्षण परिषद  केलेली  रद्द करण्यात आली. पुण्यात रेसिडनसी क्लबमध्ये आज शुक्रवार 30 ऑक्टोबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन ते पाच या वेळेत मराठा आरक्षणाबाबत मंथन करण्यात येणार होते. मात्र  उदयनराजेंनी निरोप दिल्यानंतर पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पुण्यातहीपरिषद आयोजित करण्यात आली होती. मराठा आरक्षण परिषदेला याचिकाकर्ते आणि काही वकिलांचीही उपस्थिती असणार होती. उदयनराजे मराठा आरक्षणाची सद्यस्थिती समजून घेणार होते. मात्र आता ही बैठक कधी होणार, हे अस्पष्ट आहे. याआधी, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी नवी मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण बैठकीला भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे पोहोचले होते, तर उदयनराजे भोसले यांनी दांडी मारली होती. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये या बैठकीचे आयोजन केले होते. दुसरीकडे, मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती. मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही प्रवेश मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, पात्रता गुण असूनही प्रवेश न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे आक्रमक झालेले मराठा आंदोलक आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर धडकणार आहे. येत्या 7 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाकडून ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.