मराठा क्रांती मोर्चाचा आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश’

खासदार संभाजीराजे छत्रपतीही या आंदोलनात नोंदवणार सहभाग

0

मुंबई : मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शनिवारी मराठा क्रांती मोर्चानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली होती. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर गेल्या दीड महिन्यात सरकारने कुठलंही पाऊल उचलले नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शनिवारी मराठा क्रांती मोर्चानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली होती. आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर सरकारनं कुठलीच पाऊल उचलले नाही. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना शिक्षण आणि नोकरीतील संधींपासून वंचित राहावे लागत आहे. राज्य सरकारनं आधी १२ हजारांची पोलिस भरती जाहीर केली आणि आता ऊर्जा खात्यात 9 हजार पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, आरक्षणाअभावी या भरती प्रक्रियेत मराठा समाजाला स्थान मिळणार नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येतोय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं कुठल्याही प्रकारची नोकरभरती करु नये, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावर २७ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल कऱण्यात येणार आहे. या याचिकेबाबत काय तयारी करण्यात आली आहे, याबाबतही माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात मार्गी लागत नसेल तर राज्य सरकारने मराठा समाजासाठी संपूर्ण पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. तसंच आतापर्यंत १८ ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन ठिय्या आंदोलन केले गेले. पण यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला देण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.