नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा दावा

अहमदनगरमध्येही भाजप कार्यकर्त्यांची नाराजी, आऊटगोईंग सुरू

0

अहमदनगर : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपमध्ये आऊटगोईंग सुरू झाले आहे. आता अहमदनगरमध्येही भाजप कार्यकर्त्यांची नाराजी समोर येत आहे. ‘आगामी काळामध्ये भाजपातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून पुढील काळात ते राष्ट्रवादीमध्ये येतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. प्राजक्त तनपुरे यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘

भाजपकडून हे सरकार लवकरच पडेल, असे बोलले जाते आहे. मात्र, आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार यात कुठलीही शंका नाही. पाच वर्षे चांगल्याप्रकारे पूर्ण होतील, यामुळेच त्याच्या पुढली पाच वर्षे सुद्धा आमचेच सरकार असेल, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये भाजपातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून पुढील काळात ते राष्ट्रवादीमध्ये येतील, असा दावाही तनपुरे यांनी केला. विशेष म्हणजे, अहमदनगरमध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नाहीतर श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे. राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर मनमानी कारभार करत असून पक्षाची ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत असल्याचा निषेध करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यासह परिसरातील 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांनी आपल्यापदाचा रविवारी राजीनामे दिले आहेत. ‘संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत. नाराजीचा हा परिणाम आहे’, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.