मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला, त्याच मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक मृतदेह!

मुंब्रा रेतीबंदर परिसरात सापडलेल्या मृतदेहाची पटली ओळख, पोलिस घटनास्थळी दाखल

0

ठाणे : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी आढळला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटली आहे. शेख सलीम अब्दुल असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो 48 वर्षांचा होता. शेख सलीम अब्दुल मुंब्रा रेतीबंदरचाच राहणारा होता. पोलिस अधिकाऱ्यांकडे हा मृतदेह सोपविण्यात आला आहे. आज ज्या शेख सलीम अब्दुल यांचा मृतदेह सापडला, त्याचा या सर्व प्रकरणाशी काही संबंध आहे का? त्याचा तपास आता पोलिस करतील.

मुंब्य्रातील खाडी किनारी भागात हा मृतदेह सापडला. मुंब्रा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे.शेख सलीम अब्दुल असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो 48 वर्षांचा होता. शेख सलीम अब्दुल मुंब्रा रेतीबंदरचाच राहणारा होता. पोलिस अधिकाऱ्यांकडे हा मृतदेह सोपविण्यात आला आहे. आज ज्या शेख सलीम अब्दुल यांचा मृतदेह सापडला, त्याचा या सर्व प्रकरणाशी काही संबंध आहे का? त्याचा तपास आता पोलिस करतील.  पोलिसांसमोर ही आत्महत्या आहे, हत्या, घातपात की अपघात, याचा तपास पोलिस करत आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील नाल्यात आणखी एक मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मनसुख हिरेन प्रकरणाचा एटीएसकडून तपास

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या एनआयए केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.