मनमाडचे सुपुत्र सुरेश घुगेंना काश्मीरमध्ये अपघाती वीरमरण

मनमाडसह नांदगाव तालुक्यात पसरली शोककळा

0

मनमाड : जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून नाशिकच्या सुपुत्राला वीरमरण आले. मनमाडपासून जवळ असलेल्या अस्तगाव येथील जवान सुरेश घुगे (वय ३४) यांना उपचारादरम्यान वीरमरण आले. त्यांच्या निधनाने वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली.

जम्मू काश्मीर भागात होत असलेली बर्फवृष्टी त्यामुळे खराब झालेल्या हवामानामुळे विमानाने घुगे यांचे पार्थिव आणतांना अडचणी निर्माण झाल्या असल्याने अंत्यसंस्काराबाबत लष्करी अधिकारी अधिकृतपणे निर्णय घेणार असून असल्याचे समजते. पुढील वर्षी घुगे सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने मनमाड,अस्तगावसह संपूर्ण नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली. अस्तगाव येथील सुरेश घुगे हे 2006 मध्ये भारतीय लष्करात दाखल झाले होते. ते सध्या मराठा ई बटालियन मध्ये कार्यरत होते. शुक्रवारी रात्री डोंगरावर गस्त घालत असतांना पाय घसरून घुगे खाली पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. घुगे यांच्या नातेवाईकांना पहाटे दूरध्वनीवरुन त्यांच्या निधनाची माहिती कळविण्यात आली. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी आणि 9 वर्षाची मुलगी,भाऊ,दोन बहिणी असा परिवार आहे. घुगे यांना वीरमरण आल्याचे कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. घुगे यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी अस्तगावला भेट देवून त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच अंत्यसंस्कार करण्याविषयी तयारी सुरु केली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.