ईडब्ल्यूएस आदेश काढताना राज्य सरकारकडून डावपेच – विनायक मेटे

राज्य सरकारने ईडब्ल्यूएसचा आदेश जारी करताना दोन चूका केल्याचा आरोप

0

बीड :  शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी मराठा उमदेवारांनी ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्ण्याचे स्वागत केले आहे. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाचा आदेश जारी करताना दोन चूका केल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला. शासन आदेशातील त्या चूका म्हणजे राज्य सरकारची चालबाजी असल्याची टीकाही मेंटेंनी राज्य सरकारवर केली. न्यायालयाच्या आदेशामुळे निर्णय

केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण हे  दिलेले आहे. राज्य सरकार केंद्राच्या कायद्याला रोखू शकत नाही. काही विद्यार्थी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने त्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचे आदेश दिले. यामुळे राज्य सरकारने मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेतल्याचे विनायक मेटेंनी सांगितले. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेल्या दिवसापासून मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळावा, अशी भूमिका शिवसंग्रामने घेतल्याचे विनायक मेटेंनी सांगितले.

सरकारची ईडब्ल्यूएसच्या निर्णयात चालबाजी

विनायक मेटेंनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, निर्णयातील जीआर मध्ये दोन मोठ्या चूका या सरकारने केल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही राज्य सरकारची चालबाजी आहे. सरकारने फक्त 2020-21 च्या उमेदवारांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला. संभाजीराजांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो. ते मराठा समाजाची फसवणूक होऊ नये, यासाठी बोलत आहेत, असे मेटे म्हणाले.मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी अभ्यास करण्याची गरज आहे. अशोक चव्हाणांनी माझे नाव घेऊन टीका केली. अशोक चव्हाण हे काही वाचत नाहीत, कसलीही माहिती घेत नाहीत. त्यामुळे आज मराठा समाजाची ही परिस्थिती झाली, असा आरोप विनायक मेटेंनी केला.प्रवीण गायकवाड हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मांडणी करतात. आरक्षण हे धर्मावर नसून जातीवर आहे. प्रवीण गायकवाड यांनी कसलाही संभ्रम निर्माण करू न करता समाजाचे हित बघावे, असे आवाहन विनायक मेटेंनी केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.