ग्रामपंचायतींना गावनिहाय विकासकामांचे फलक लावणे अनिवार्यची मागणी

छावा क्रांतिवीर सेनेचे गटविकास अधिकारी यांना निवेदन

0

पैठण : पैठण तालुक्यातील गावनिहाय ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेली विकास कामे याचे फलक जनतेच्या नजरेस पडेल, अशा ठिकाणी लावण्यात यावे, जेणेककरून जनतेला या कामकाजांबाबत माहिती मिळेल, यासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे गटविकास अधिकारी यांना निवेदनातून मागणी केली आहे.

पैठण तालुक्यातील महसूल गावाची संख्या १९१ असून एकूण ग्रामपंचायत संख्या १०७ एवढी आहे. राज्य सरकार/केंद्र सरकार यांनी ग्रामपंचायतमधील नागरिकांना सुविधा मिळावी, यासाठी विविध योजनांअंतर्गत भरघोस निधी देत असून, त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी चांगले निर्णय घेत कुठलाही आडमार्ग  न ठेवता प्रशासकीय निधी सरळ ग्रामपंचायत खात्यावरती वर्ग करत आहे. त्यामध्ये 14 वित्त आयोग, जनसुविधा, पाणीपुरवठा, विशेष प्रकल्प निधी, घरकुल, स्वच्छ भारत मिशन, दलित वस्ती सुधार योजना, 25/15 अशा अनेक योजनेअंतर्गत गाव विकासासाठी निधी राज्य सरकार/केंद्र सरकार यांच्याकडून मिळत आहे. या निधीचा विनियोग करण्याचे कार्य प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक तथा सरपंच यांची असते. परंतु कित्येक ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. त्या संदर्भात अनेक तक्रारी येत आहे. विकास कामे व त्यावर खर्च निधी इतर ग्रामस्थांना समजले पाहिजे, यासाठी वरील संदर्भविषयानुसार आपण या निवेदनावर दखल घेत पैठण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत/ग्रामसेवक यांना करण्यात आलेली विकास कामांंचे फलक लावणे अनिवार्य व बंधनकारक आहे. हे आपल्या कार्यालयीन स्तरावरून सूचित करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे गटविकास अधिकारी यांना निवेदनातून मागणी केली आहे. यावेळी उपस्थित प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, जिल्हा सचिव भगवान सोरमारे, भाऊराव धरम, अनिल मगरे, अर्जुन कदम, नितेश वैद्य आदींची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.