‘दंबग 3’मधून मलायका अरोरा आऊट, सलमानला दिले सडेतोड उत्तर

0

अभिनेता सलमान खानची वहिनी म्हणजेच मलायका अरोरा आपल्या अफेअरमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्याबाबतीत एक बातमी समोर आली आहे. मलायकाला ‘दबंग 3’ चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.

मलायकाचे ‘दबंग’ चित्रपटातील मुन्नी बदनाम हुई हे आयटम साँग हिट झाले होते. त्यानंतर तिने ‘दबंग 2’ मध्येदेखील आयटम साँग केले होते. या दोन्ही चित्रपटात आयटम साँग केल्यानंतर मलायका ‘दबंग 3’मध्ये सुद्धा झळकणार असल्याचे बोलले जात होते.

मात्र सलमानचा भाऊ अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिला दबंगच्या टीममधून काढण्यात आले आहे. सलमानच्या सांगण्यावरूनच अरबाजने मलायकाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे, असे सांगितले जाते.

सलमानला पूर्वीपासूनच मलायका आणि अर्जुन कपूरच्या नात्यावर आक्षेप घेतला होता. मात्र दबंद 3 मधून बाहेर काढल्यानंतर मलायकानेदेखील प्रत्युत्तर दिले आहे.

एका कार्यक्रमात ती म्हणाली, ‘आयटम साँग करणा-यांवर कोणत्याही प्रकारचा टॅग लागलो, असे मला वाटत नाही. मी आतापर्यंत बरेच आयटम साँग केले आहेत. त्यामुळे माझ्यावर कुणी टॅग लावला असल्याचे मला नाही वाटत. मला जे आवडते तेच काम मी करते. मी नेहमी चित्रपट पाहून गाण्यांची निवड करते.’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.