करमाड परिसरात उत्साहात मकरसंक्रांत सण साजरा

जुन्या संकटांना मूठमाती देऊन एकमेकांना नव्याने सुख-समृद्धीच्या आनंदासाठी तीळगूळ देऊन शुभेच्छा!

0

करमाड  :  तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, असे म्हणत मकरसंक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली. करमाड परिसरातील गावातील मंदिरात देवासमोर विविध फळांचे वाण ठेवण्यासाठी महिलांची सकाळपासून गर्दी झाली होती. सोशल मीडियावरही दिवसभर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारे संदेश झळकले.

मकरसंक्रात म्हणजेच प्रकाशाचा अंधारावर विजय, अशी संकल्पना असल्याने या दिवशी मनातील जुन्या जळमटांना विसरून नव्याने सुख-समृद्धीचे जीवन सुरू करण्यासाठी एकमेकांना तीळगूळ देऊन शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. त्यामुळे करमाड परिसरातील नातेवाईक, कार्यालयीन सहकाऱ्यांना तीळगूळ आणि हलव्याचे वाटप करतात. या दिवशी घरांमध्ये पूरणपोळीचे जेवणाचा खवय्यांनी आस्वाद घेतला. मंदिरांमध्येही देवाच्या मूर्तीला दागिन्यांनी सजविले होते. किरकोळ वस्तूंच्या दुकानांत संक्रांतीचे वाण खरेदी करणाऱ्या महिलांची वर्दळ दिवसभर सुरू होती. संक्रांतीनिमित्त महिलांनी मंदिरात एकत्र येऊन एकमेकींना तिळगूळ आणि संक्रातीचे वाण देत अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आजही डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात कायम ठेवली आहे. अशा आनंददायी उत्साहात हा सण साजरा केला. तसेच चिमुकल्यांनी सुद्धा मकरसंक्रांतच्या निमित्ताने पतंग खरेदी करत ते दिवसभर उडवून आपला आनंद व्यक्त करताना दिसले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.