बनगाव येथे कृषी विभागाच्या वतीने ‘महिला किसान दिन साजरा
जिजाऊ चरित्र भेट देऊन सभापती घागरे यांच्या हस्ते महिला शेतकरी सन्मान
करमाड : औरंगाबादमधील बनगाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने ‘महिला किसान दिन” गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. महिला शेतकरी साखराबाई बनकर यांना सभापती घागरे यांच्या हस्ते ‘जिजाऊ चरित्र’ भेट देऊन सत्कार करण्यात आला
बनगाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने ‘महिला किसान दिन” गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी साजरा केला. महिला शेतकरी साखराबाई बनकर यांना सभापती घागरे यांच्या हस्ते ‘जिजाऊ चरित्र’ भेट देऊन सत्कार करण्यात आला. कृषी सहाय्यक संजीव साठे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शेतकरी शेतीचा गाडा चालवत असताना त्यांच्या बरोबरीने महिला शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची असते. सर्व पिकांची गवत काडी वेचून व मशागत करण्याचे काम महिला करतात तसेच ऊन, वारा, पाऊस असो शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीचे काम करतात त्यामुळे त्या लेकीचा सन्मान व्हावा म्हणून ‘महिला किसान दिन’ साजरा केला जातो तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती देताना ‘आत्मा’ तर्गत महिला शेतकरी, महिला सक्षमीकरण व कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग याबाबत मनोगत कृषी सहाय्यक संजीव साठे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला सभापती पंचायत समिती छायाताई घागरे, पंचायत समिती कृषी अधिकारी एस. आर. मामेडवार, विस्तार अधिकारी डी. एम. जोशी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी राजू घागरे, बापू कुबेर, साखराबाई बनकर, महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.