15 एप्रिलपासून मराठी ‘बिग बॉस’, महेश मांजरेकर करणार सूत्रसंचालन

0

‘बिग बॉस’ आता मराठीत येणार असल्याने सर्वांनाच त्याची उत्सूकता लागली आहे. सर्वात वादग्रस्त मानला जाणारा हा शो मराठीमध्ये कसा असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

तसेच या शोमध्ये मराठीतील कोणकोणते कलाकार सहभाग घेणार आहेत, याबाबत जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सूकता आहे. मात्र बिग बॉसने याविषयी गुप्तता पाळली आहे. स्पर्धकांची नावे अद्याप समोर आली नसली तरी या शोचे सूत्रसंचालन कोण करणार हे कळाले आहे.

मराठी अभिनेते महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. हा शो 15 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तसेच एकूण 15 स्पर्धक या शोमध्ये सहभाग घेणार आहेत. हे स्पर्धक कोण असतील हे मात्र 15 एप्रिललाच कळेल. 100 दिवस घरात मोबाईलशिवाय राहावे लागणार असल्याने अनेक कलाकांनी याकडे पाठ फिरवली असली तरी शोबाबत उत्सूकता तेवढीच आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.