श्रीनगर हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपूत्र यश देशमुख शहीद

पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख शहीद, भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला

0

जळगाव : काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख शहीद झाले. देशाच्या रक्षणासाठी अवघ्या २१ व्या वर्षी आपल्या प्राणाची बाजी लावली.

चाळीसगाव तालुक्यातील जवान यश दिगंबर शहीद झालेत. काल दुपारी दोन वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर गेल्या सात महिन्यापूर्वीच त्यांची पहिलीच पोस्टींग श्रीनगरला झाली होती. देशाच्या रक्षणासाठी अवघ्या २१ व्या वर्षी आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, दोन बहीण आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. श्रीनगर जवळील एचएमटी येथे गस्त घालत असलेल्या सैन्य दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी हल्ला करुन पळ काढला आहे. यात गेल्या दीड वर्षांपूर्वीच यश देशमुख यांची लष्करात रुजू झाले होते. दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.