राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रमुख मंत्र्यांचे मंत्रीपद धोक्यात?

0

गेल्या वर्षापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबत राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या विस्तारात काही प्रमुख मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी नवीन चेह-यांना संधी मिळणार असल्याचे कळते.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जयकुमार रावल, बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.

या मंत्र्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीत भाजप आमदार आशिष शेलार, संजय कुटे यांच्या नावाची चर्चा रंगत आहे. मात्र याबाबत फडणवीस सरकारने कोणतेही ठोस संकेत दिले नाहीत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.