‘महाराष्ट्र पोलिस आम्हाला तुमचा सार्थ अभिमान’ मुख्यमंत्री

राज्यातील पोलिस पदक जाहीर झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र पोलिस आम्हाला तुमचा अभिमान आहे’, अशा शब्दांत राज्यातील राष्ट्रपती पोलिस पदक, शौर्य पोलिस पदक आणि पोलिस पदक जाहीर झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक, शौर्य पोलिस पदक आणि पोलिस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता पाच ‘राष्ट्रपती पोलिस पदक’, १४ पोलिस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलिस पदक’ जाहीर झाली आहेत. विजेत्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलिस पथकाचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.