महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर
...या संकेतस्थळावर परीक्षार्थी निकाल पाहून करू शकता गुणपत्रिका डाऊनलोड
मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षार्थी निकाल पाहू शकतात. mahresult.nic.in या संकेतस्थळावर परीक्षार्थी निकाल पाहून गुणपत्रिका डाऊनलोड करू शकता.
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षार्थी निकाल पाहू शकतात. mahresult.nic.in या संकेतस्थळावर परीक्षार्थी निकाल पाहून गुणपत्रिका डाऊनलोड करू शकता. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या तर बारावीच्या परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत पार पडल्या होत्या. यंदा दहावीचा निकाल 29 जुलै कर बारावीचा निकाल 16 जुलैला जाहीर झाला होता. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा निकाल जाहीर होण्यास विलंब झालाा. यावेळेस बारावीचे सर्व पेपर्स सुरळीत पार पडले होते तर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 15.69 लााख विद्यार्थी बसले होते. तर साधरण तितकेच विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस बसले होते. दरम्यान, बोर्डाने 20 नोव्हेंबरपासून रिपीटर परीक्षा किंवा पुरवणी परीक्षा आयोजित केल्या होत्या. आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे.