महादेव शकुजी चाबुकस्वार यांचे निधन

महादेव चाबुकस्वार यांचे राहत्या घरी ह्रदयविकाराने निधन

0

पैठण  : अमरापूर वाघुंडी,ता.पैठण येथील  महादेव शकुजी चाबुकस्वार. (वय 58 )यांचे रविवारी 18 आँक्टाेबर  राेजी सकाळी राहत्या घरी  ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर अमरापूर वाघुंडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले.

अमरापूर वाघुंडी, ता.पैठण येथील  महादेव शकुजी चाबुकस्वार. (वय 58 )यांचे रविवारी 18 आँक्टाेबर  राेजी सकाळी राहत्या घरी  ह्रदयविकाराने निधन झाले. अमरापूर वाघुंडीच्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, एक स्नुषा, जावई, तीन भाऊ, पुतणे, असा  परिवार आहे. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा.  त्यांचा स्वभाव मनमिळावु, नेहमी सहकार्याची भूमिका शांत असल्याने ते सर्व परिचित हाेते. गावात त्यांच्या निधनामुळे माेठी हळहळ व्यक्त हाेत आहे. पत्रकार तथा कवी चंद्रकांत चाबुकस्वार यांचे ते चुलत भाऊ तर पाेलिस पाटील कडुबाळ चाबुकस्वार हे त्यांचे पुतणे आहेत. त्यांचा ‘जलदान विधी’चा कार्यक्रम शनिवार  ता.24 आँक्टाेबर  राेजी सकाळी बारा वाजण्याच्या आत करण्याचे ठरविले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.