लॉकडाऊनचा काळ वाढणार चर्चेला उधाण, केंद्राचा कोणताही विचार नाही – राजीव गाैबा

२१ दिवसांच्या लॉकडाऊन वाढवणारच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम

0

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता, सद्यस्थितीचे २१ दिवसांचे लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवणार असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. पण, थेट केंद्राकडूनच ही चर्चा नाकारली आहे. केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी सोमवारी लॉकडाऊन वाढवणारच्या चर्चा परतवून लावल्या. ‘ही सारी माहिती, हे अहवाल पाहून मी थक्कच होत आहे. लॉकडाऊनचा काळ वाढवण्याचा कोणचाही विचार तूर्तास नाही’, असे गौबा म्हणाले. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधत कोरोना व्हायरसच्या महामारीशी लढण्याकरिता लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आपल्यापुढे असल्याचे सांगितले. या मोठ्या निर्णयासाठी त्यांनी देशातील नागरिकांची माफीही मागितली.
गरिबांचा आपल्यावर असणारा रोष अपेक्षित असून कोरोनावर मात करण्यासाठीच लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जनतेशी संवाद साधताना मोदींनी सर्वांनाच या संकटाला धाडसाने सामोर् जाण्याचे आवाहन करत आणखी काही दिवसांसाठी या लक्ष्मण रेषेचे पालन करण्याची गरज आहे. गर्दी टाळा आणि सोशल डिस्टन्स पाळा. हा लढा कठीण असल्यामुळे त्यावर कठोर मार्गांनीच मात करणे कोट्यवधी भारतीयांच्या हिताचे असेल ही बाब त्यांनी आवर्जून केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.