‘लॉकडाऊन’: राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक; गृहमंत्रालयाची नवी नियमावली जाहीर

कोरोना लशीच्या वितरणासाठी आतापासूनच तयारीला लागा; पंतप्रधान मोदींचे राज्यांना आदेश

0

नवी दिल्ली : देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. तसेच राज्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावी, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा. तसेच घरी जाऊन आणि निर्धारित प्रोटोकॉलनुसार कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, अशा सूचनाही केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. हे दिशानिर्देश 1 ते 31 डिसेंबरपर्यंत लागू असतील.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे :  सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक,  सामाजिक अंतर राखणे गरजेचे,  सतत हात धुणे आवश्यक,  चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी, * जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी,  धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी
* बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. आगामी काळात कोरोना लशीच्या वितरणासाठी प्रत्येक राज्याने आतापासूनच तयारीला लागावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कोरोना लशीच्या वितरणात राज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लशीचे वितरण राज्यांतील यंत्रणेच्या माध्यमातूनच पार पडणार आहे. या कामात राज्यांचा अनुभव कामी येणार आहे. त्यासाठी राज्यांनी कोरोना लशीच्या वितरणासाठी आतापासूनच पुढाकार घेऊन काम करायला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.