विधान परिषद : सेनेकडून उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी तर राष्ट्रवादीकडून खडसे

राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावांची शिफारस

0

मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचे नाव विधान परिषदेसाठी घेतले जात होते, पण कुठला पक्ष त्यांना उमेदवारी देणार हे काही स्पष्ट झाले नव्हते. अखेर शिवसेनेकडून मातोंडकर यांचे नाव विधान परिषदेसाठी सुचवण्यात आले आहे.विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावं सुचविण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी 4 – 4 नावं पुढे आली आहेत.

शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर आणि मुझफ्फर हुसेन या नावांची शिफारस करण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादीकडून भाजपमधून आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव सुचवण्यात आले आहे. याशिवाय राष्र्ट्रवादीने राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे या नावांची शिफारस केल्याचं समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर जेमतेम पाच महिने पक्षात राहिल्या. मुंबईतून निवडणूक हरल्यानंतरही काही काळ त्या काँग्रेसमध्ये कार्यरत होत्या. त्यांनी  पक्षातील अंतर्गत राजकारणाला वैतागून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विधान परिषदेच्या जागांची चर्चा सुरू झाल्यानंतर उर्मिला यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. शिवसेना मातोंडकर यांच्या नावाची विधान परिषदेसाठी शिफारस करणार असल्याच्या बातमीला शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दुजोरा दिला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.