ठाण्यातील झणझणीत ‘मामलेदार मिसळवाले’ लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे निधन
लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर (वय 84 )यांचे निधन; ठाणे शहरात पसरली शोककळा
ठाणे : ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे. लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर 1952 मध्ये मामलेदार मिसळ हे हॉटेल सुरू केले होते. त्यांच्या पश्चात लक्ष्मणशेठ यांनी नरसिंह मुर्डेश्वर यांची परंपरा अखंडित सुरू ठेवली. खरंतर, गेली अनेक वर्षे ते मिसळच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता खवय्यांची सेवा करीत होते. मागील आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यातील ‘कौशल्य’ रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारपर्यंत ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, आज सकाळी त्यांचे निधन झाले. लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांच्या निधनामुळे ठाणे शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातंवडे असा परिवार आहे. मुर्डेश्वर यांच्या निधनाची बातमी कळताच कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.