करमाड परिसरात पावसाने पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

पिकाची सरसकट नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी

0

करमाड  : औरंगाबाद तालुक्यातील सर्वत्र गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने पाऊस कमी जास्त प्रमाणात पडत असल्याने नदी नाल्याना पुर आला आहे. तसेच जून महिन्यात लागवड केलेल्या पिके हातातोंडाशी आल्यावर पावसाने झोडपल्यान पिके वाया गेली आहे. काढणीला आलेल्या मुग पावसाच्या पाण्यात भिजवून शेंगांना कोंब फुटून उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन, उडीद आणि फळबाग मोसंबी, डाळींब पिकाच्या फळांचे जास्त प्रमाणात झालेल्या संततधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

भांबर्डा, दुधड, जयपूर, बनगाव, शेकटा, गाढेजळगाव, गोलटगाव, कौडगाव, सटाणा, शेवगा, कुबेर  गेवराई, वरझडी, वडखा,आडगाव सरक, हातमाळी या गावांत सुरवातीलाच पावासाने जोरदार हजेरी लावल्याने नदी-नाले तुंबूड वाहू लागले होते. त्यामुळे या परिसरातील सर्व धरणेही शंभर टक्के भरून वाहू लागले मात्र गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने झोडपत असलेल्या जोरदार पावसाने परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनीतून आणि लागवड केलेल्या पिकातून पाणी फुटून वाहत  आहेत त्यामुळे दोन ते तीन महिने औषधी फवारणी न करिता आल्याने कपाशी पीक जास्त पाण्याने पिवळे पडू लागले. तसेच डाळींब बागेच्या फळांना पावसाने औषधी फवारणी करता येत नसल्याने डाळींब ,मोसंबी फळबागेचे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठे नुकसान झाले आहे. करमाड परिसरात सतत गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची फळ बागेवर फवारणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागेला चांगल्या प्रकारे फळ आलेले डाळींब फळांवर काळे डांगे पडून खराब होऊन सडत खाली पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. दुष्काळाच्या परिस्थिती आणि पाणी टंचाईच्या काळात बागेला भर उन्हाळ्यात टँकरने विकत पाणी देऊन ही बाग टिकवून ठेवली. मात्र आतातरी दोन पैसे हाती येईल, असे वाटत असतांना चांगल्या प्रकारे बहरलेलं पीक पावसाने जोरदार तडाखा येत शेतकऱ्यांच्या मालाची दाणादाण उडवली आहे. त्यात शेतकऱ्यांचे बागेतील फळे जास्त पाण्याने डांग पडून सडले तर उरलेल्या फळावरही डाग पडले आहे. त्या करणाने बाजारातील व्यापरीही या फळांची बेभाव खरेदी करत असल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना बेभावाने व्यापाऱ्याला आपला माल विक्री करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दरवर्षी लाखो रुपयांचे होणाऱ्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत. औरंगाबाद तालुक्यातील सर्वत्र झालेल्या जोरदार पावसाने पिकाने झालेल्या नुकसानग्रस्त पिकाची सरसकट नुकसान शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गकडून केली जात आहे. तरी शासन व विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत विचार करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी अविनाश जाधव, भिका नजन, राधाकिसन दिवटे, संतोष दिवटे, कुंडलिक भवर, सोमिनाथ जाधव, सोमनाथ काळे,नारायण काळे,दत्ता चौधरी, एकनाथ चौधरी,शिवाजी बोरडे, आबासाहेब पठाडे, निवृत्ती मते,प्रभाकर फुकटे,अनिल भवर, सुगंध काळे,परमेश्वर पठाडे,बंडू पठाडे,विजय पठाडे यांनी केली आहे. जून महिन्यात हजारो रुपये खर्च करून लागवड केलेली मका, कपाशी पीक सतत पडणाऱ्या पावसाने खराब झाल्यानं माझे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतातील कपाशी व मका पिकांत पूर्ण पाणी वाहत  आहेत. तरी शासनाने तात्काळ पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.