कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू; आज 81 प्रभागांसाठी आरक्षण जाहीर

शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून प्रभागाचे आरक्षण जाहीर

0

कोल्हापूर   : महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया आज पूर्ण झाली यामध्ये सर्वच ८१ प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाल पूर्ण झाला झाल्यानंतर आयुक्त कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया आज पूर्ण झाली. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण सोडतीनंतर काहींनी आनंद साजरा केला तर काहींनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत हरकती नोंदवणार असल्याचे स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात अनुसुचित जाती प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत झाली. यातून अकरा प्रभाग अनुसुचित जाती प्रवर्गासाठी निश्र्चित करण्यात आले. यातील सहा अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी एकूण बावीस प्रभागांचे आरक्षण निश्चित करून त्यापैकी अकरा प्रभाग पुरूष व अकरा प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात एकूण सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या 48 प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले. यातून २४ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आरक्षण सोडत जाहीर झाली. आरक्षण सोडतीनंतर शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला. तर काहींनी मिरवणुका काढल्या.

नागरिकांचा मागास प्रवर्ग –

प्रभाग क्रमांक 18- महाडिक वसाहत प्रभाग क्रमांक 22 – विक्रम नगर प्रभाग क्रमांक 23 – रुईकर कॉलनी प्रभाग क्रमांक 25 – शाहुपुरी तालीम प्रभाग क्रमांक 26 – कॉमर्स कॉलेज प्रभाग क्रमांक 38 – टाका खाण, माळी कॉलनी प्रभाग क्रमांक 50 – पंचगंगा तालीम प्रभाग क्रमांक 59 – नेहरूनगर प्रभाग क्रमांक 72 – फुलेवाडी प्रभाग क्रमांक 73 – फुलेवाडी रिंग रोड प्रभाग क्रमांक 80 – कनेरकर नगर क्रां. नाना पाटील नगर

नागरिकांचा मागास प्रवर्ग -(महिलांसाठी राखीव प्रभाग)  : प्रभाग क्रमांक 13 – रमणमळा., प्रभाग क्रमांक 15 – कनान नगर., प्रभाग क्रमांक 21 – टेंबलाईवाडी., प्रभाग क्रमांक 24 – साइक्स एक्सटेन्शन., प्रभाग क्रमांक 36 – राजारामपुरी., प्रभाग क्रमांक 49 – रंकाळा स्टँड., प्रभाग क्रमांक 52 – बलराम कॉलनी., प्रभाग क्रमांक 53 – दुधाळी पॅव्हेलियन., प्रभाग क्रमांक 56 – संभाजीनगर बस स्थानक., प्रभाग क्रमांक 64 – शिवाजी विद्यापीठ., प्रभाग क्रमांक 71 – रंकाळा तलाव

अनुसूचित जातीचे आरक्षित प्रभाग खालीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक 7 – सर्किट हाऊस., प्रभाग क्रमांक 8 – भोसलेवाडी-कडमवाडी., भाग क्रमांक 16 – शिवाजी पार्क (महिला)., प्रभाग क्रमांक 19 – मुक्त सैनिक वसाहत (महिला)., प्रभाग क्रमांक 20 – मार्केट यार्ड., प्रभाग क्रमांक 30 – कॉल खंडोबा महिला., प्रभाग क्रमांक 40 – दौलत नगर महिला., प्रभाग क्रमांक 62 – बुद्ध गार्डन., प्रभाग क्रमांक 67 – रामानंदनगर जरगनगर महिला., प्रभाग क्रमांक 75 – आपटेनगर तुळजाभवानी महिला., प्रभाग क्रमांक 79 – सुर्वे नगर

सर्वसाधारण प्रभाग  : प्रभाग क्रमांक 4 – लाईन बाजार., भाग क्रमांक 6- पोलीस लाईन., प्रभाग क्रमांक 9 – कदम वाडी., प्रभाग क्रमांक 17 – सदर बाजार., प्रभाग क्रमांक 27 – ट्रेझरी ऑफिस., प्रभाग क्रमांक 29 – शिपुगडे तालीम., प्रभाग क्रमांक 31- बाजार गेट., प्रभाग क्रमांक 35 – महालक्ष्मी मंदिर., प्रभाग क्रमांक 36 – यादव नगर., प्रभाग क्रमांक 37 – राजारामपुरी तवणाप्पा पाटणे हायस्कूल., प्रभाग क्रमांक 42 – पांजरपोळ., प्रभाग क्रमांक 46 – सिद्धाळा गार्डन., प्रभाग क्रमांक 47 – फिरंगाई तालीम., प्रभाग क्रमांक 51 – लक्षतीर्थ वसाहत., प्रभाग क्रमांक 54 – चंद्रेश्वर., प्रभाग क्रमांक 61 – सुभाष नगर., प्रभाग क्रमांक 63 – सम्राट नगर., प्रभाग क्रमांक 66 – स्वातंत्र्य सैनिक कॉलनी., प्रभाग क्रमांक 68 – कळंबा फिल्टर हाऊस., प्रभाग क्रमांक 70 – राजलक्ष्मी नगर., प्रभाग क्रमांक 74 – सानेगुरुजी वसाहत., प्रभाग क्रमांक 76 – साळोखे नगर., प्रभाग क्रमांक 77 – शासकीय मध्यवर्ती कारागृह., प्रभाग क्रमांक 78 – रायगड कॉलनी.

सर्वसाधारण प्रभाग (महिलांकरिता राखीव) : प्रभाग क्रमांक 1 – शुगर मिल., प्रभाग क्रमांक 2 – कसबा बावडा पूर्व बाजू., प्रभाग क्रमांक 3 – कसबा बावडा हनुमान तलाव., प्रभाग क्रमांक 5 – लक्ष्मीविलास पॅलेस., प्रभाग क्रमांक 10 – शाहू कॉलेज., प्रभाग क्रमांक 11 – ताराबाई पार्क., प्रभाग क्रमांक 12 – नागाळा पार्क., प्रभाग क्रमांक 14 – व्हीनस कॉर्नर., प्रभाग क्रमांक 28 – सिद्धार्थनगर., प्रभाग क्रमांक 32 – बिंदू चौक., प्रभाग क्रमांक 32 – शिवाजी उद्यम नगर., प्रभाग क्रमांक 39- राजारामपुरी एक्सटेंशन., प्रभाग क्रमांक 41 – प्रतिभानगर., प्रभाग क्रमांक 43 – शास्त्रीनगर जवाहरनगर., प्रभाग क्रमांक 44 – मंगेशकरनगर., प्रभाग क्रमांक 45 – कैलासगडची स्वारी., प्रभाग क्रमांक 48 – तटाकडील तालीम., प्रभाग क्रमांक 55 – पद्माराजे उद्यान., प्रभाग क्रमांक 57 – नाथा गोळे तालीम., प्रभाग क्रमांक 58 – संभाजीनगर., प्रभाग क्रमांक 60 – जवाहरनगर., प्रभाग क्रमांक 65 – राजेंद्रनगर., प्रभाग क्रमांक 69 – तपोवन., प्रभाग क्रमांक 81 – नानापाटील नगर जिवबानाना पार्क.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.