ऐन दिवाळीत कोल्हापूरने गमावला सुपुत्र, पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात जवान शहीद

लॉकडाऊनमध्ये 120 दिवस गावी, नंतर ऋषीकेश जोंधळे 11 जून रोजी पुन्हा कामावर रुजू

0

कोल्हापूर : कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे भारतीय सैन्यातील जवान शहीद झाले. ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे भारतीय सैन्यातील जवान शहीद झाले. ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे 2018 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ऋषीकेश यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. ते 6 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. लॉकडाऊन काळात 120 दिवस गावी राहिल्यानंतर ऋषीकेश जोंधळे हे 11 जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाले. सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झालेले जवान ऋषीकेश जोंधळे हे अविवाहित होते. राष्ट्रीय खेळाडू असल्याने ते इंडियन आर्मीमध्ये भरती झाले. लहानपणापासून उराशी बाळगलेले देश सेवेचे स्वप्न पूर्ण झालेले असतानाच ऋषीकेश यांना वीरमरण आले. ऐन दिवाळीत आपल्या सुपुत्राला गमावल्याने कोल्हापूरसह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद ऋषीकेश जोंधळे यांचे पार्थिव उद्या रात्री त्यांच्या मूळगावी आणले जाईल, अशी माहिती आहे.

पाकिस्तानच्या कुरापतीला भारताचेही प्रत्युत्तर

आज पाकिस्तानने सीमेजवळील तीन भागांमध्ये शस्त्रसंघीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याचे एक बीएसएफ अधिकारी, एक जवान शहीद झाले असून तीन स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारानंतर भारतानेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताने प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत दोन आयल डंप, चार फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त केल्या.
पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू होता. याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने प्रत्येक सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले. काश्मीरमधील हाजी पीर तंगधार आणि गुरेज सेक्टरच्या पलीकडे पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या तीन फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त केल्या. ज्यामध्ये 6 ते 7 पाकिस्तानी सैनिक ठार मारले गेले. याशिवाय तीन कमांडोदेखील या प्रत्युत्तराच्या कारवाईत मारले गेले.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.