उसाच्या रसाचे आहेत अनेक फायदे, रोज प्या एक ग्लास ज्यूस

0

उन्हाळा आला की ठिकठिकाणी उसाच्या रसवंती दिसतात. अगदी कडाक्याचा उन्हात उसाचा रस पिण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. आपण गर्मीपासून बचाव म्हणून उसाचा रस पितो. मात्र तुम्हाला माहित आहे, का उसाच्या रसाचे शरीराला अनेक फायदे आहेत. अनेक आजारांपासून दूरही ठेवतो. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यानेदेखील रस मधुमेहच्या रुग्णांसाठीसुद्धा हा रस योग्य असतो. तसेच उसाच्या रसामुळे डिहायड्रेशनपासूनही बचाव होतो. आज जाणून घेऊया उसाच्या रसाचे फायदे…

* त्वचेसाठी उत्तम – अल्फा हायड्रोक्सी अॅसिड आणि ग्लायकोलिक अॅसिडचे प्रमाण असल्याने उसाचा रस त्वचेसाठी उत्तम आहे. तसेच यामुळे पिंपल्सची समस्या नाहीशी होते. त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात.

* उर्जा मिळते – यात ग्लूकोजचे प्रमाण अधिक असते. ग्लूकोज आणि इलेक्ट्रॉलाइट्समुळे हे एक उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. यामुळे उर्जा मिळते आणि ऊन लागण्यापासूनही बचाव होतो.

* तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्तता – उसाच्या रसामध्ये अॅटीबॅक्टेरिअलचे प्रमाण असल्याने तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्तता मिळते. दातांना इंन्फेक्शनपासून बचाव होतो आणि दात निरोगी राहण्यात मदत होते.

* किडनीसाठी रामबाण उपाय – उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग तसेच किडनीशी संबंधित रोगांवर रामबाण उपाय आहे. तसेच उसाच्या रसामुळे यकृताचे कार्य सुधारण्यासही मदत होते.

* कावीळसाठी फायदेशीर – उसाचा सर कावीळसाठी गुणकारी आहे. कावीळ झाल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्ल्यास कावीळ लवकर बरा होतो.

* कॅन्सरवर उपाय – उसाच्या रसातील फ्लॅवॉन घटक आहे. त्यामुळे उसाच्या रस कॅन्सरला कारणीभूत ठरणा-या घटकांची शरीरात निर्मिती रोखण्याचे कार्य करते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.