…रविवारी तलावात आढळला किरण साठेचा मृतदेह, त्याच्यावर होता खुनाचा आरोप?

दौलताबाद परिसरातील मोमबत्ता तलावात त्याचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

0

औरंगाबाद : दौलताबाद येथील माळीवाड्यातील रहिवासी सोनाली किरण साठे या महिलेची गुरुवारी (29 ऑक्टोबर) हत्या करण्यात आली होती. पती किरण अशोक साठे यानेच किरणचा खून केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. तेव्हापासून अशोक घरातून बेपत्ता होता. परंतु रविवारी त्याचा मृतदेह दौलताबाद परिसरातील मोमबत्ता तलावात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोनाली आणि किरण यांचा 17 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. या दोघांमध्ये भांडणेही झाल्याचे तपासात उघड झाले आहे. दौलताबाद पोलिसांनी सांगितले की, सोनालीवर शुक्रवारी गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हापासून तिचा पती बेपत्ता होता. मात्र रविवारी संध्याकाळी तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच की हत्या आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी सांगितले.

सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल

पती-पत्नीच्या मृत्यूंनंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये किरण साठे याने पुण्यातील मित्राला फोन करत सोनालीला संपवल्याचा संवाद आहे. ”मी तिचा विषय आता संपवला. नेहमी वाद होत असल्याने मी वैतागलो होतो. मी खूप सहन केले, पण प्रकरण वाढतच होते. त्यामुळे अखेर तिला संपवले.” ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र ही क्लिप किरणचीच आहे याबाबत अद्याप पडताळणी झालेली नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.