बॉलिवूडच्या किंग खानचा 55 वा वाढदिवस

वयापेक्षाही कमी शाहरुखची पहिली कमाई, आज शाहरुख बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक

0

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आज 55वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्ली येथे झाला होता. शाहरुखचे वडिल ताज मोहम्मद खान एक स्वातंत्र्य सैनिक होते. तर शाहरुखच्या आईचं नाव फातिमा होतं. शाहरुखची एक मोठी बहिणही आहे, तिचं नाव शहनाज लालारूख आहे. शाहरुखची बहिणही शाहरुखसोबत मुंबईतच राहते.

शाहरुख खान आपल्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे आपल्या आजोळी मंगळूरू येथे होता. त्यानंतर तो आपल्या आई-वडिलांसोबत दिल्लीतील राजिन्दर नगरमध्ये राहण्यासाठी गेला. दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमध्ये शाहरुखने  शिक्षण घेतले. शाहरुख केवळ अभ्यासातच नव्हे तर हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेटमध्येही अव्वल होता. अवॉर्ड मिळवण्याची सवय शाहरुखला शाळेपासूनच झाली होती. शाळेत त्याला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले होते. त्यानंतर शाहरुखने हंसराज कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर त्याने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात मास कम्युनिकेशनच्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतला. परंतु, त्याने कोर्स पूर्ण केला नाही. शाहरुखला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. लहानपणी तो रामलीलेत सुग्रीवच्या सेनेत असणाऱ्या एका माकडाची भूमिका साकारत असे.  शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाहरुखने प्रसिद्ध नाटक दिग्दर्शक बॅरी जॉन यांच्याकडून दिल्लीतील थिएटर अॅक्शन ग्रुपमध्ये अभिनयाचे धडे गिरवले. बॅरी जॉन शाहरुखच्या या यशाचं संपूर्ण श्रेय शाहरुख खानलाच देतात. परंतु, शाहरुख आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या चाहत्यांना आणि त्यांनी आजवर शाहरुखला दिलेल्या प्रेमाला देतो.

फार कमी लोकांना माहिती आहे की, सुरुवातीला बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी शाहरुख दिल्लीतील दरियागंज परिसरात एक हॉटेल चालवत होता. शाहरुखची पहिली कमाई अवघी 50 रुपये होती. शाहरुखने दिल्लीत झालेल्या पंकज उदास यांच्या एका कॉन्सर्टमध्ये गाइड म्हणून काम केले होते. ‘तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नहीं… तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी.’ शाहरुखने चित्रपट डर मध्ये साकारलेली ‘क्क्क… किरण वाल्या भूमिकेप्रमाणेच रियल लाइफमध्येही तो एक पझेसिव्ह बॉयफ्रेंड होता. शाहरुखचं गौरीवर जिवापाड प्रेम आहे. शाहरुख गौरीला शोधण्यासाठी पत्ता नसतानाही मुंबईपर्यंत पोहोचला होता. “हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है.. और प्यार… एक बार ही होता है.” रोमांस किंग शाहरुख खानचा आज 55वा वाढदिवस. शाहरुख आजही लाखो तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आलेल्या ‘माई नेक्सट गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन’मध्येही शाहरुखने या गोष्टीचा उल्लेख केला आहे. तेव्हापासून पुन्हा एकदा शाहरुख आणि गौरीची लव्ह स्टोरी चर्चेत आली आहे. दरम्यान, आज शाहरुख बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आज 55 वर्षांचा झाला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भामुळे शाहरुख आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.