मराठा समाजाकडून आरक्षणाचा खेळखंडोबा, ओबीसीतून आरक्षण; आमचा विरोध

तीन नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे

0

मुंबई : ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास माझा तीव्र विरोध आहे. तीन नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी देऊन मराठ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. वारंवार अशा मागण्या करून मराठा समाजाने आरक्षणाचा खेळखंडोबा केला.

ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास माझा तीव्र विरोध आहे. तीन नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी देऊन मराठ्यांवर टीकास्त्र सोडले आहे वारंवार अशा मागण्या करून मराठा समाजाने आरक्षणाचा खेळखंडोबा केला. 30 वर्षांपूर्वीही अशीच मागणी केली होती, त्यावेळीही संघर्ष पेटला होता, आता पुन्हा हेच होत आहे, या मराठ्यांचा बोलवता धनी कुणी दुसराच आहे, ज्याला आरक्षण द्यायचे नाहीये, अशी टीकाही त्यांनी केली आहे. एसईबीसीचे बिल पास झाले, तेव्हा मराठा समाजाने ढोल बडवले, पेढे वाटले, साखर वाटली आणि आत्ता उपरती झाली. हे ओबीसी समाज कधीही सहन करणार नसल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. कायद्यात अशी तरतूद आहे की, ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, महाराष्ट्रात दोन समाजांत द्वेष निर्माण करण्याचे काम काही जण करत आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचे षडयंत्र सुरू आहे. मराठा समाजाचे राजकारण होत आहे, ओबीसी समाजाचे ताट खेचण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना एसईबीसीतून आरक्षण मिळू शकते. या मुद्द्यावर आम्ही ओबीसी समाज बचाव आंदोलन करणार आहोत. 3 तारखेला सर्व तलाठी, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे. अजित पवार पाच मिनिटांत ‘सारथी’ला निधी देऊ शकतात, पण ओबीसी समाजाचा प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला मुहूर्त सापडत नाही. कालच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला नाही. हे सोपस्कार सरकार का करते, असा सवालच प्रकाशअण्णा शेंडगेंनी उपस्थित केला आहे. ओबीसी समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचे का?, असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला आहे. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचे वय वाढत चालले, त्यांना वेठीस धरायला नको, असेही विजय वडेट्टीवारांनी सांगितले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.