खडसे समर्थकांच्या गाड्या प्रवेश सोहळ्यासाठी सज्ज, बॅनवरून हटवले कमळ

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

0

जळगाव : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कधी करणार याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. अशा परिस्थिती तिकडे मुक्ताईनगरात तयारीला सुरुवात झाल्याचं चित्र आहे.

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कधी करणार याबाबतच्या चर्चा सुरु आहेत.  मुक्ताईनगरात तयारीला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केले. कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण आहे. ते मुंबईकडे प्रवेश सोहळ्याला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.  खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित केली. त्यानुसार एकनाथ खडसे  येत्या  विजयादशमी दिनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली . खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.