खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, शरद पवारांच्या उपस्थितीत बांधले घड्याळ

राजकारणात झालेल्या अन्यायामुळे ते भाजपला रामराम ठोकत आता हातावर बांधले घड्याळ

0

मुंबई : एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हाता  घड्याळ बांधले.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. कालपर्यंत भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हातात  घड्याळ बांधले. एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असून  त्यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपसाठी कार्य केले. मात्र राजकारणात झालेल्या अन्यायामुळे ते भाजपला रामराम ठोकत आता हातावर घड्याळ बांधले आहे. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थिती होती. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी गुरुवारी दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांचीही उपस्थिती आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.