कर्नाटकचा ‘हिंदकेसरी’ महाराष्ट्रात थेट पाेलिस उपअधीक्षकपदी; नियुक्ती अडचणीत

गृहमंत्रालयाने क्रीडा विभागाकडे मागवला शेरा, क्रीडा संचालनालयानचा हा शेरा, विजेतेपदाची नोंदच नाही

0

औरंगाबाद  : महाराष्ट्र शासनाने कर्नाटकचा ‘हिंदकेसरी मल्ल ‘सुनील साळुंखेला तीन वर्षांपूर्वी थेट पाेलिस उपअधीक्षकपदी दिलेली नियुक्ती संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गृह मंत्रालयाने क्रीडा विभागाकडे शेरा मागवला.

नुरा कुस्तीचा शिक्का; नुसतीच गदा
कर्नाटक कुस्ती असाेसिएशनच्या वतीने २०१५ मध्ये ‘हिंदकेसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. मात्र, या आयाेजनाला अद्याप अधिकृत मान्यताच नसल्याचे बोलले जाते. कारण, हे आयाेजन संशयाच्या भाेवऱ्यात सापडले हाेते. राष्ट्रीय फेडरेशन व आयाेजकांमध्ये फायनलच्या पाच मिनिटांपूर्वी देवाण-घेवाणीवरून सामना रंगला. आयाेजक ऐकत नसल्याचे लक्षात आल्यावर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर फायनल झाली. यात यजमान संघाच्या सुनील साळुंखेने फायनल जिंकली. मात्र, त्याला नुसतीच गदा देण्यात आली. प्रमाणपत्र काही दिवसांनंतर देण्यात आले. याशिवाय या स्पर्धेच्या आयाेजनाचीही अधिकृत अशी नाेंद कुठेही झालेली नाही. महाराष्ट्र शासनाने कर्नाटकचा ‘हिंदकेसरी मल्ल ‘सुनील साळुंखेला तीन वर्षांपूर्वी थेट पाेलिस उपअधीक्षकपदी  दिलेली नियुक्ती संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गृह मंत्रालयाने क्रीडा विभागाकडे शेरा मागवला. क्रीडा संचालनालयानेही हा ‘ताे महाराष्ट्रातील ‘हिंदकेसरी’ नव्हेच’चा शेरा दिल्याने साळुंखेचे हे पद अडचणीत सापडले. संबंधित स्पर्धेत यजमान कर्नाटकच्या ब संघाचे प्रतिनिधित्व साळुंखेने केले हाेते. मात्र, महाराष्ट्राचा असल्याने त्याला २०१८ मध्ये नियुक्ती मिळाली. आता गृह मंत्रालयाने अहवाल मागवून घेतला. २०१५ मध्ये कर्नाटकच्या जमखंडी येथे त्याने ‘हिंदकेसरी’चा किताब पटकावला होता.

खास बक्षिसी मिळाली
मला महाराष्ट्र शासनाने किताब जिंकल्याने खास बक्षिसीतून ही नियुक्ती दिली, अशी प्रतिक्रिया सुनील साळुंखेने दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.