कॉमेडिअन कपिल शर्मा आज अडकणार लग्नगाठीत, गर्लफ्रेंडसोबत घेणार सप्तपदी

0

कॉमेडिअन कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ आज (दि. 12) लग्नगाठीत अडकणार आहेत. त्यांचे लग्नविधी सुरु झाले आहेत. कपिल-गिन्नीच्या लग्नाच्या निमित्ताने मंगळवारी रात्री जागो सेरेमनीचे आयोजन केले होते. यावेळी कपिलचा मोठा भाऊ भांगडा करताना दिसला. तसेच कपिलच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी पैसेही उडवले. पंजाबी कुटुंबातील हा एक महत्वाचा भाग असतो.

                                      कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ 

कपिलच्या लग्नात विनोदवीर भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, राजीव ठाकूर, गायिका ऋचा शर्मा, सुदेश लहरी आदी कलाकार सहभागी झाले आहेत. तसेच ‘द कपिल शर्मा’ शोची संपूर्ण टीम लग्नात हजर आहे.

                       कपिल शर्मा आणि त्याचे मित्र-मैत्रीणी 

कपिल हादेखील दोन पद्धतीने लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. 12 डिसेंबरला तो हिंदू पद्धतीने तर 13 डिसेंबरला पंजाबी पद्धतीने लग्नगाठीत अडकणार आहे. 14 डिसेंबरला कपिलच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होणार आहे. त्यात त्यांचे नातेवाई मित्र सामील होतील.

                 कपिल शर्मा आणि गिन्नी यांच्या लग्नाचे ठिकाण असे सजवण्यात आले 

त्यानंतर 24 डिसेंबरला मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन पार पडेल. यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज आणि प्रसिद्ध कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मागील वर्षी कपिलने ‘मीट

                               कपिल शर्माची आई मेहंदी काढताना 

माय वाईफ’ अशा पोस्टसह गिन्नीसोबतचे नाते चाहत्यांना सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअप बातमी समोर आली होती. मात्र ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

                          कपिल शर्माच्या लग्नात सहभागी झालेले त्याचे मित्रमंडळी 

गिन्नी आणि कपिल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथे दोघांची ओळख झाली आणि मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी ‘हस बलिये’ या शोमध्ये एकत्र काम केले. तसेच कपिल कॉलेजमध्ये गिन्नीची नाटकांच्या प्रयोगांत मदत करत होता. असे करता करता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

                         कपिल शर्मा त्याची आई आणि गायिका ऋचा शर्मा 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.