कोल्हापुरात आज मराठा आरक्षणप्रश्नी न्यायिक परिषद सुरू

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती

0

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे, सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई आदींसह इतरांनी परिषदेचे आयोजन केले. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आयोजित केलेल्या न्यायिक परिषदेला सुरवात झाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या परिषद्ला सुरवात झाली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण सहाराष्ट्रात उमटले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरची लढाई तर केलीच आता न्यायालयीन लढाईसाठी अधिक बळकट होण्याची गरज असून त्यासाठीच आज कोल्हापुरात न्यायिक परिषद पार पडत आहे.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे, सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई आदींसह इतरांनी परिषदेचे आयोजन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. आता मराठा आरक्षणाची लढाई न्यायालयात लढली जाणार आहे. न्यायालयीन लढाई लढण्याकरिता विचारविनिमय करण्यासाठी रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने न्यायिक परिषदेचे आयोजन केले.  या परिषदेला कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर येथील निमंत्रित विधिज्ञ व मुंबई उच्च न्यायालयात वीस वर्षांपेक्षा अधिक काळ वकिली करणारे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीला मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संदर्भात अपील चालवलेले वकील या परिषदेला अॅड. श्रीराम पिंगळे, अॅड.आशिष गायकवाड, अॅड. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, प्रा. जयंत पाटील, अॅड.रणजित गावडे, जयेश कदम, दिलीप पाटील, दिलीप देसाई हे सर्व उपस्थित राहिले असून थोड्याच वेळात खासदार संभाजीराजे छत्रपती सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत कोल्हापूरसह सांगली, सातारास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील वकील सुद्धा उपस्थित राहिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण सहाराष्ट्रात उमटले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरची लढाई तर केलीच आता न्यायालयीन लढाईसाठी अधिक बळकट होण्याची गरज असून त्यासाठीच आज कोल्हापुरात न्यायिक परिषद पार पडत आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात आवाज उठवण्यासाठी व न्यायिक विचारविनिमय करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने आज न्यायिक परिषद पार पडत आहे.

 

 

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.