बाबरी विध्वंसप्रकरणी उद्या निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश

'बाबरी' खटल्यावर सीबीआयचे विशेष न्यायालय निकाल देणार

0

नवी दिल्ली : बाबरी खटल्यावर सीबीआयचे विशेष न्यायालय बुधवारी निकाल देणार आहे. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी आहेत.

कोरोना महामारी लक्षात घेता यातील काही आरोपींनी निकालावेळी  प्रत्यक्ष हजर न राहण्याची परवानगी मिळण्याची विनंती केल्यास, तशी मुभाही न्यायालयाकडून मिळू शकते. तशी विनंतीही आडवाणी, जोशी यांचे वकील के. के. मिश्रा न्यायालयाला करणार असल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष हजर राहण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची विनंतीही ते न्यायालयाला करू शकतात. तसेच शिवसेना नेते विनय कटियार, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहू शकणार नसल्याचे न्यायालयाला यापूर्वीच सांगितलं आहे. आरोपी लल्लू सिंह कोरोनाग्रस्त आहेत, तर महंत नृत्यगोपाल दास क्वारंंटाईन आहेत. बाबरी खटल्यावर मागच्या तीन वर्षांपासून सलग सुरु असलेला युक्तीवाद 1 सप्टेंबरला संपला. न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव या खटल्यावर बुधवारी निकाल देणार आहेत. या खटल्यात भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद तसेच इतर साधू-संत मिळून एकूण 49 आरोपी आहेत. यातील 17 आरोपींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 5 ऑक्टोबर 1993 ला तपास करुन या सर्व 49 आरोपींवर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.